loader image

बहुतेक वेळा आपल्या समाजात असे आढळते की महिला फक्त गर्भधारणेच्या काळातच प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist) डॉक्टरांचा सल्ला घेतात. परंतु, वास्तवात स्त्रीचे आरोग्य केवळ गर्भधारणा किंवा प्रसूतीपुरते मर्यादित नसते. मासिक पाळीपासून ते रजोनिवृत्तीपर्यंत, स्त्रियांच्या शरीरात अनेक शारीरिक, हार्मोनल व मानसिक बदल होत असतात. त्यामुळे, प्रत्येक महिलेनं दरवर्षी एकदा तरी गायनेकोलॉजिस्टची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

आरोग्य तपासणी केल्याने सुरुवातीच्या टप्प्यावर आजारांचे निदान होते व योग्य उपचार मिळाल्यास गुंतागुंती टाळता येतात.

पाळी अनियमित होणे (Periods Irregularity) – पाळी वेळेवर येत नसेल, खूप लांब अंतराने येत असेल किंवा अगदी लवकर-लवकर होत असेल, तर ते हार्मोनल असंतुलनाचे लक्षण असू शकते.

जास्त प्रमाणात रक्तस्राव (Heavy Bleeding) – सलग ७ दिवसांपेक्षा जास्त रक्तस्राव, मोठ्या रक्ताच्या गाठी जाणे, वारंवार पॅड बदलण्याची गरज भासणे हे लक्षण दुर्लक्षित करू नये.

पाळी दरम्यान तीव्र वेदना (Severe Cramps) – सामान्य वेदना सहन करता येतात, पण औषधांशिवाय सहन न होणारी वेदना, कामकाजात अडथळा आणणारी पोटदुखी ही Endometriosis किंवा Adenomyosis सारख्या आजारांची चिन्हे असू शकतात.

थोड्या प्रमाणात पारदर्शक स्त्राव होणे सामान्य आहे. पण जर स्त्राव: पिवळा, हिरवा, तपकिरी किंवा दुर्गंधीयुक्त असेल, खाज सुटत असेल, जळजळ होत असेल, तर लगेच स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हे संसर्ग, बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस, फंगल इन्फेक्शन किंवा लैंगिकरित्या पसरत असलेल्या आजारांचे लक्षण असू शकते.

पोटाखालील भागात सतत वेदना होणे, संभोगावेळी दुखणे किंवा सतत जडपणा जाणवणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. यामागे फायब्रॉइड्स, सिस्ट, एंडोमेट्रिओसिस यांसारखे आजार असू शकतात.

१२ महिने नियमित प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर वंध्यत्वाचा तपास करणे आवश्यक आहे. पुरुष व स्त्री या दोघांचीही तपासणी झाल्यावर योग्य निदान करून गाइनकोलॉजिस्ट व फर्टिलिटी स्पेशालिस्ट यांच्या मदतीने उपचार घेता येतात.

पाळीच्या दरम्यान किंवा पाळीबाहेरील दिवसांत रक्तस्राव होणे, संभोगानंतर रक्त येणे किंवा रजोनिवृत्तीनंतर (Menopause नंतर) रक्तस्राव दिसणे – हे कधीही सामान्य नसते. हे गर्भाशयातील पॉलिप्स, फायब्रॉइड्स, हार्मोनल समस्या किंवा कॅन्सरची प्रारंभिक लक्षणे असू शकतात.

महिलांच्या आयुष्यातील ४५–५५ वयोगटात पाळी कायमची थांबते, याला रजोनिवृत्ती म्हणतात. या काळात हार्मोनल बदलांमुळे: हाडे कमजोर होणे (Osteoporosis) हृदयविकाराचा धोका वाढणे अंगाची लाही होणे (Hot Flushes) झोप न लागणे योनीत कोरडेपणा व वेदना या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी नियमित तपासणी व योग्य उपचार महत्त्वाचे आहेत.

अर्चित हॉस्पिटल, संगमनेर – महिलांच्या आरोग्याचे संपूर्ण समाधान

संगमनेरमधील अर्चित हॉस्पिटल येथे, डॉ. अमित ताजणे यांच्या नेतृत्वाखाली, सर्व प्रकारच्या स्त्रीरोग समस्यांचे आधुनिक पद्धतीने निदान व उपचार करण्यात येतात. लेप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे) व मिनिमली इनव्हेसिव्ह उपचार – ज्यामुळे शस्त्रक्रिया कमी वेदनादायक, कमी रक्तस्राव होणारी आणि लवकर बरे होणारी असते.

  • फायब्रॉइड्स (Fibroids)
  • हिस्टरेक्टॉमी (Hysterectomy) – गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया
  • एंडोमेट्रिओसिस (Endometriosis)
  • सर्व्हायकल कॅन्सर व गर्भाशयाचे इतर
  • गर्भाशयातील पॉलिप्स (Polyps)
  • एडेनोमायोसिस (Adenomyosis)

महिलांचे आरोग्य ही केवळ गर्भधारणा व प्रसूतीपुरती मर्यादित बाब नाही. मासिक पाळीतील बदल, असामान्य रक्तस्राव, अंगावरून जाणे, ओटीपोटातील वेदना, वंध्यत्व किंवा रजोनिवृत्तीनंतरची लक्षणे अशा कोणत्याही समस्यांना दुर्लक्षित करू नये.

आजच आपली वार्षिक आरोग्य तपासणी करण्यासाठी अर्चित हॉस्पिटल, संगमनेर येथे संपर्क करा. कोणत्याही स्त्रीरोगासंबंधी समस्येसाठी आजच डॉ. ताजणे यांचा सल्ला घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

Address

1st floor, Madhukunj Complex,
Link Road, New, Navin Nagar Rd,
Sangamner, Maharashtra 422605

E-mail

dr.tajaneamit@gmail.com

Phone Number

+91-8668617773

Meet the Doctors

Empowering Women's Health with Expert Care

Dr. Amit Ashok Tajane | Laparoscopic Gynecologist & Fertility Expert
Dr. Amit Ashok Tajane

Laparoscopic Gynecologist & Fertility Expert
MBBS, DGO (Obs & Gyne)
Fellowship in Assisted Reproductive Treatments (Israel)
Fellowship in Gynecologic Endoscopy (Germany)

Dr. Priyanka Amit Tajane | Clinical Embryologist
Dr. Priyanka Amit Tajane

Clinical Embryologist

Our Achievements
0 +

Laparoscopic Surgeries

0 +

Years of Experience

0 +

Babies Delivered

नवीन जीवनाची सुरुवात...

Our Services

Comprehensive health care for women of all age group

Maternity Care

Providing comprehensive and nurturing care throughout your pregnancy journey.

Dr. Tajane Website Gynecolgy Treatment Icon

Gynecologic Treatments

Expert care for all gynecological issues, tailored to women of all ages.

Dr. Tajane Website Laparoscopy Treatment

Laparoscopic Surgeries

Advanced minimally invasive surgeries for precise and effective treatment.

Dr. Tajane Website IVF Treatment Icon

Infertility Diagnosis

Thorough and compassionate diagnosis to help you on your path to parenthood.