गरोदरपणात सोनोग्राफी कधी करावी? when to do sonography during pregnancy?
गरोदरपणात सोनोग्राफी कधी करावी? Check out the complete sonography timetable for Archit Hospital, Sangamner. Learn about essential scans at each stage for a healthy pregnancy. Visit the best sonography center in Sangamner for expert maternity care.
१. पहिली सोनोग्राफी (६ – १० आठवडे)
या सोनाग्राफीत पुढील गोष्टी समजतात.
- गर्भधारणा व्यवस्थित झाली आहे का ?
- गर्भ एक आहे की जास्त आहेत ?
- गर्भ गर्भाशयातच आहे ना? .
- हृदयाचे ठोके आहे का ?
- गर्भाभोवती रक्तस्त्राव झाला आहे का ?
- पाळीच्या तारखेप्रमाणे वाढ झाली आहे. का?
- तारीख नक्की नसल्यास डिलीव्हरीची तारीख काढता येते.
२. दुसरी सोनोग्राफी (१२-१५ आठवडे) (NT Scan)
ही तपासणी बाळाचे नाकाचे हाड व मानेच्या मागे साठलेल्या द्रव पदार्थाची जाडी बघण्यासाठी केली जाते या मध्ये Down Syndrome, Cystic hygroma या आजारांचा अंदाज येऊ शकतो. तसेच डोक्याची कवटी, पाठीचा कणा, जठर हृदय, लघवीची पिशवी, हात, पाय, नाळ वार यांची तपासणी होते गर्भपिशवीच्या तोंडाची लांबी, अंडाशयाच्या गाठी याची ही तपासणी होते या तपासणीमध्ये ६०% दोष कळतात.
३. तिसरी सोनोग्राफी (१९-२० आठवडे) (Anomaly Scan)
या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या सर्व अवयवांची तपासणी केली जाते. व त्यामधील दोष ८० ते ८५% कळतात. बाळाच्या चेहऱ्याचे दोष चांगलया प्रकारे कळण्यासाठी 3D किंवा 4D Scan करतात.
४. चौथी सोनोग्राफी (२४-२६ आठवडे)
काही विशेष केसेसमध्ये व आधीच्या बाळाला हृदयाचा काही दोष असल्यास चौथी सोनोग्राफी २४-२६ आठवड्यामध्ये करतात. त्यामध्ये हृदयाचे दोष चांगल्याप्रकारे कळतात.
५. पाचवी सोनोग्राफी ३७-३८ आठवडे
या सोनोग्राफीमध्ये बाळाची वाढ, अंदाजे वजन, हालचाल, बाळाची स्थिती, बाळाभोवतीचे पाणी, नाळेचा मानेभोवती वेढा, वारेची जागा या गोष्टी समजतात.
६. कलर डॉप्लर सोनोग्राफी
ही तपासणी बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित आहे की नाही. ते बघण्यासाठी केली जाते. बाळाची वाढ, वजन, बाळाभोवतीचे पाणी कमी असल्यास आईला रक्तक्षय, उच्चरक्तदाब, इतर कोणताही जुना आजार असल्यास ही तपासणी करतात.
१. या दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कमीत कमी ५ सोनोग्राफी अवश्यक असतात. याशिवाय जर आईला अचानक काही त्रास सुरु झाला जसे की, रक्तस्त्राव होणे, अवेळी पोटात दुखणे, बाळाची हालचाल कमी किंवा बंद होणे, पोटावर आघात होणे, अपघात होणे तर अधिकची सोनोग्राफी करावी लागू शकते.
२. बाळातील सर्व दोष एकाच सोनोग्राफीत कळत नाहीत. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर सोनोग्राफी परत करणे गरजेचे असते.
३. आईच्या पोटाची जाडी, बाळाची स्थिती, बाळाच्या भोवतीचे पाणी यावर बाळात दिसणाऱ्या दोषाचे निदान अवलंबून असते.
४. बाळांची संख्या (एक, जुळे, तिळे) हे सुरुवातीच्या २-३ महिन्याच्या सोनोग्राफीत व्यवस्थित कळते. सहा महिन्यानंतर पहिल्यादांच सोनोग्राफी करत असल्यास जुळयाचे निदान चुकू शकते.
५. वारंवार सोनोग्राफी केल्याने बाळावर कुठलेही दुष्पपरिणाम होत नाहीत. पण दर महिन्याला सोनोग्राफी करणे गरजेचे नसते.
६. बाळातील बहुतांश ८०-८५% दोष २० आठवड्याच्या Anomoly Scan मध्ये कळतात. तसेच कायद्याने बाळामध्ये दोष असल्यास गर्भपात करण्याची मर्यादा फक्त २० आठवडे असल्याने ती सोनोग्राफी वेळेवर होणे गरजेचे असते. २० आठवड्यानंतर बाळामध्ये काही दोष आढळून आल्यास गर्भपात करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची किचकट व मानसिक त्रास देणारी होते.
७. गर्भातील अनेक दोष जसे की, डोक्याचा आकार कमी असणे (Microcephaly) डोक्यामध्ये पाणी साठणे. (Hydrocephalus) बाळाचे हात, पाय वाकडे असणे (Achondroplasia) मध्ये छाती व पोट वेगळे करणाऱ्या पडद्यामध्ये भोक असणे. (Diaphragmatic Hernia ) मुत्रपिंडाची सुज हे ६ व्या, ७ व्या महिन्यानंतर दिसू लागतात. त्यामुळे ते ५ व्या महिन्याच्या Scan मध्ये दिसत नाहीत.
८. गर्भातील काही दोष जसे हृदयातील अतिशय लहान छिद्र (Small VSD, ASD) रक्तवाहिन्यांचे काही आजार दृष्टीचे व ऐकू येण्यांचे आजार सोनोग्राफीत दिसून येत नाहीत.
९. बाळाचा रंग काय असेल ते हुशार असेल की मतिमंद ते सोनोग्राफीत दिसून येत नाही.
१०. PCPNDT कायद्याप्रमाणे बाळाचे लिंग उघड करण्यास सक्त मनाई असल्याने जनेनद्रियासंबंधित दोषांचे निदान सोनोग्राफीत करता येत नाही. ते आपल्याला डिलीव्हरीनंतरच समजू शकतात.
११. अन्ननलिका व श्वासनलिका जोडलेली असणे, गुद्दार बंद असणे, आतड्याचे दोष, बोटांची संख्या, कानाचा आकार हे दोष डिलीव्हरीनंतरच कळतात. सोनोग्राफीत कळत नाहीत.
१२. सोनोग्राफीत अवयवांच्या रचनेतील दोष कळतात. त्यांच्या कार्यपद्धतीतील दोष कळत नाही.
१३. आनुवंशिक आजाराचे निदान सोनोग्राफीवरून करता येत नाही.
१४. Down Syndrame मध्ये (एक प्रकारचे मतिमंदत्व) याचे निदान सोनोग्राफीवरुन ८०% खात्रीने केले जाते.
Quadraple Marker ही ब्लड टेस्ट केल्यास निदानाची शक्यता ९६% पर्यंत वाढते म्हणून प्रत्येक गर्भवतीने ही टेस्ट करणे गरजेचे आहे.
१५. गरोदरपणात कधी X-Ray करण्याची गरज पडल्यास डॉक्टरांना तशी कल्पना द्यावी. क्ष किरणांचा बाळावर विपरित परिणाम होऊ शकतो.
To schedule your sonography at Archit Hospital in Sangamner, contact us.
टीम अर्चित हॉस्पिटल
डॉ. अमित ताजणे, डॉ. प्रियांका ताजणे
Address
1st floor, Madhukunj Complex,
Link Road, New, Navin Nagar Rd,
Sangamner, Maharashtra 422605
dr.tajaneamit@gmail.com
Phone Number
+91-8668617773
Meet the Doctors
Empowering Women's Health with Expert Care

Laparoscopic Gynecologist & Fertility Expert
MBBS, DGO (Obs & Gyne)
Fellowship in Assisted Reproductive Treatments (Israel)
Fellowship in Gynecologic Endoscopy (Germany)

Clinical Embryologist
Our Achievements
Laparoscopic Surgeries
Years of Experience
Babies Delivered
नवीन जीवनाची सुरुवात...
Our Services
Comprehensive health care for women of all age group

Maternity Care
Providing comprehensive and nurturing care throughout your pregnancy journey.

Gynecologic Treatments
Expert care for all gynecological issues, tailored to women of all ages.

Laparoscopic Surgeries
Advanced minimally invasive surgeries for precise and effective treatment.

Infertility Diagnosis
Thorough and compassionate diagnosis to help you on your path to parenthood.
